मेनिन्गोकोकल मेनिन्जायटीस प्रामुख्याने मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या अस्तरांवर परिणाम करतं आणि सूज तयार करतं. तथापि, संसर्गाच्या गांभीर्यानुसार लक्षणं बदलू शकतात. काही सामान्य लक्षणांमध्ये यांचा समावेश आहे:
- ताप
- डोकेदुखी
- मळमळ उलट्या होणं
- ताठ मान (हलवता न येणं)
- भ्रमिष्ट मानसिक स्थिती
- फोटोफोबिया (प्रकाशाची व्हिज्युअल संवेदनशीलता)
मेनिन्गोकोकल सेप्टिसेमिया हा संसर्गाच्या अधिक गंभीर प्रकारांपैकी एक आहे. हे गडद जांभळी रॅश आणि वेगवान रक्ताभिसरण काम न करणं अशा स्वरूपात दिसू शकतं, जे बऱ्याचदा जीवघेणं सिद्ध होतं.
जटिलता
अगदी लवकर निदान होऊनही, सुमारे ८% ते १५% रुग्ण संसर्गाच्या पहिल्या २४ ते ४८ तासांपर्यंत सुद्धा जगू शकत नाहीत.
५ पैकी १ बचावलेल्यांमध्ये बहिरेपणा, नर्व्हस सिस्टमच्या (मज्जासंस्थेच्या) समस्या, मेंदू खराब होणं यासारख्या जटिलता होऊ शकतात.