सध्या, जपानी इन्सेफ्लायटिसवर कोणताही विशिष्ट उपचार नाही. तथापि, औषधे, द्रव आणि ऑक्सिजनसह लक्षणात्मक उपचारांमुळे त्या व्यक्तीस संसर्गाविरूद्ध लढण्यास मदत होते.
You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.
Agree Agree Agree Stayजपानी इन्सेफ्लायटिस हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो संक्रमित डास चावण्याद्वारे पसरतो. लसीकरणाच्या माध्यमातून हे टाळता येते.
आपल्या निर्धारित वेळेत या लसीकरणाचा (व्हॅक्सिनेशनचा) डोस चुकवला गेला असल्यास, आपल्याला कॅच-अप लसीकरणासाठी (व्हॅक्सिनेशनसाठी) आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेता येईल.
जपानी इन्सेफ्लायटिस लसीकरणाबद्दल अधिक माहितीसाठी आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.
जपानी इन्सेफ्लायटिस हा फ्लॅव्हि व्हायरसमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग आहे. या विषाणूची लागण झालेल्या डासांच्या चाव्यामुळे तो पसरतो. संसर्गाचा प्राथमिक स्त्रोत फ्लॅव्हि व्हायरस वाहून नेणारी डुकरं आणि पक्ष्यांमध्ये आढळतो, जो नंतर संक्रमित जनावरांना चावल्यावर डासांमध्ये संक्रमित होतो. या रोगामुळे मेंदूला सूज येऊ शकते किंवा गंभीर प्रकरणांमध्ये नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मेंदूचे कायमचे नुकसान होऊ शकते. विषाणू वाहून नेणारे डास मुख्यत: उष्णकटिबंधीय भागात प्रजनन करतात, ज्यात दलदलीची जमीन, डुकरांची शेती आणि भात शेती चा समावेश आहे.
गंभीर गुंतागुंत झालेल्या चारपैकी एक प्रकरणात संसर्गामुळे मरण आलेले दिसते.
हा विषाणूजन्य आजार डासांमुळे प्राण्यांकडून माणसांमध्ये पसरतो. डुक्कर आणि पक्षी हे या विषाणूचे मुख्य वाहक आहेत. जेव्हा डास कोणत्याही संक्रमित प्राणी किंवा पक्ष्यांना चावतो तेव्हा त्याला विषाणूची लागण होते. आता जर तो संक्रमित डास माणसांना चावला तर तो विषाणूवर माणसामध्ये प्रवेश करतो आणि तो संक्रमित होतो.
हा विषाणू मानवी संपर्कातून किंवा पेय किंवा अन्न सामायिक करण्याद्वारे पसरत नाही.
या आजाराची लागण झालेल्या बहुतेक लोकांमध्ये डोकेदुखी किंवा मळमळ यासारखी कोणतीही किंवा सौम्य लक्षणे दिसत नाहीत. लक्षणे सहसा फ्लूची लागण म्हणून धरले जाते जे चुकीचे असू शकते.
तथापि, जपानी इन्सेफ्लायटिसची लागण झालेल्या लोकांपैकी काही टक्के लोकांना मेंदूत संसर्ग पसरत असताना गुंतागुंत होते. क्वचितच गंभीर स्थिती असलेल्या व्यक्तीस याचा अनुभव येऊ शकतो:
गंभीर गुंतागुंत असलेली व्यक्ती जिवंत राहिली तर त्याला मेंदूचे कायमचे नुकसान, एक किंवा दोन अवयवांमध्ये अर्धांगवायू, कमकुवत स्नायू, अनपेक्षित हिसका बसून हालचाल होण्याचा अनुभव येऊ शकतो.
जपानी इन्सेफ्लायटिस लस सहसा दोन महिने किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी शिफारस केली जाते.
तथापि, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लस घेतलेल्या व्यक्तीस सौम्य आणि अल्पकालीन दुष्परिणाम जाणवू शकतात, जसे की:
जर दुष्परिणाम कायम राहिले तर कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
सध्या, जपानी इन्सेफ्लायटिसवर कोणताही विशिष्ट उपचार नाही. तथापि, औषधे, द्रव आणि ऑक्सिजनसह लक्षणात्मक उपचारांमुळे त्या व्यक्तीस संसर्गाविरूद्ध लढण्यास मदत होते.
ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड तर्फे एक जनजागृती उपक्रम. डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई ४०० ०३०, भारत.
या साहित्यात दिसणारी माहिती फक्त सामान्य जनजागृतीसाठी आहे. या साहित्यात कोणताही वैद्यकीय सल्ला दिलेला नाही. कोणतेही वैद्यकीय प्रश्न असल्यास, आपल्या स्थितीबद्दल आपल्यास असलेले कोणतेही प्रश्न किंवा समस्या असल्यास कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दर्शविलेली आजाराची यादी पूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया आपल्या मुलाच्या डॉक्टरांचा (पेडिएट्रिशियनचा) सल्ला घ्या. या साहित्यात दर्शविलेले डॉक्टर केवळ उदाहरणात्मक उद्देशाने वापरले जात आहेत आणि एक व्यावसायिक मॉडेल आहे. आजाराचे प्रतिनिधित्व करणारे आयकॉन/प्रतिमा आणि अॅनिमेशन केवळ उदाहरणात्मक उद्देशाने आहेत.