हे जन्मदोषांचं एक मुख्य कारण आहे जे लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केलं जाऊ शकतं. गर्भवती महिलांमध्ये* रुबेला गर्भाच्या मृत्यूचं किंवा जन्मजात दोषांचं कारण असू शकतं.
रुबेला व्हायरसने (विषाणूने) लस न घेतलेल्या गर्भवती महिलेलांना संक्रमित केल्यास, गर्भपात होण्याची शक्यता असते किंवा जन्माला आल्यावर तिच्या बाळाचा मृत्यू होऊ शकतो.
ती तिच्या तयार होणाऱ्या बाळाला व्हायरस (विषाणू) देऊ शकते, ज्यामुळे जन्मतः गंभीर दोष उद्भवू शकतात जसे की:
- हृदयाची समस्या
- ऐकण्याची शक्ती आणि दृष्टी गमावणं
- इंटलेक्च्युअल डीसऍबिलिटी (बोधात्मक अपंगत्व)
- लिव्हर (यकृत) किंवा स्प्लिनचं (प्लीहाचं) नुकसान
असे गंभीर जन्मदोष सामान्य असतात जेव्हा पहिल्या तिमाहीत गर्भवती महिलांना संसर्ग होतो. हे जन्मदोष सी.आर.एस किंवा कॉनजेनायटल रुबेला सिंड्रोम म्हणून ओळखले जातात.
*एम.एम.आर लसीकरण (व्हॅक्सिनेशन) गर्भधारणा प्लॅन करण्यापूर्वी ३ महिने आधी घेणं गरजेचं आहे.