आपल्या मुलाने आधीच्या कोणत्याही घटसर्प (डिपथेरिया)-युक्त लसीकरण दिल्यावर ऍलर्जीक रिॲक्शन किंवा हायपरसेन्सिटिव्हिटी (अतिसंवेदनशीलता) अनुभवली असेल तर त्यांना पुढील घटसर्प (डिपथेरिया) लसीकरण देण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
अक्यूट सीव्हीयर फेबराईल आजाराच्या (सामान्यत: सुमारे आठवडाभर राहणारा ताप) बाबतीत घटसर्प (डिपथेरिया) लसीकरण (व्हॅक्सिनेशन) पुढे ढकललं गेलं पाहिजे. कोणत्याही लसीकरणानंतर ऍलर्जी किंवा आजार झाल्यास, आपल्या मुलाच्या डॉक्टरांना (पेडिएट्रिशियनना) कळवा.