सर्वात सामान्य साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) बऱ्याचदा सौम्य असतात आणि आपणहून निघून जातात.
सामान्य साइड इफेक्ट्स (दुष्परिणाम) असे आहेत:
- शॉट दिल्यामुळे हात दुखावणं
- ताप येणं
- शॉट दिलेल्या ठिकाणी सौम्य रॅश उठणं
- सांध्यामध्ये तात्पुरती वेदना आणि ताठरता जाणवणं
लसीकरणानंतर गंभीर ऍलर्जीक रिॲक्शन दुर्मिळ आहेत परंतु प्राणघातक असू शकतात.
गंभीर ऍलर्जीक रिॲक्शनच्या लक्षणांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणं, हृदयाचा ठोके वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणं, चेहरा आणि घसा यांना सूज येणं आणि पोळ्या (हाईव्ह्ज) यांचा समावेश असू शकतो.
अशा रिॲक्शन जाणवल्या तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, किंवा जवळच्या रुग्णालयात जा.
साइड इफेक्ट्सबद्दल (दुष्परिणामांबद्दल) अधिक माहितीसाठी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.