You are now leaving GSK’s website and are going to a website that is not operated/controlled by GSK. Though we feel it could be useful to you,we are not responsible for the content/service or availability of linked sites. You are therefore mindful of these risks and have decided to go ahead.
Agree Stayयाकरिता माहिती शोधत आहे:
शिंगल्स, ज्याला हर्पिस झोस्टर सुद्धा म्हणतात, व्हॅरिसेला झोस्टर विषाणू पुन्हा सक्रिय झाल्याने होतो. कांजण्या (चिकनपॉक्स) झाल्यावर किंवा व्हेरिसेला झोस्टर विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर हा विषाणू आयुष्यभर शरीरात सुप्तावस्थेत राहतो. वयानुसार, रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या कमकुवत होते, ज्यामुळे सामान्यत: निष्क्रिय विषाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतो आणि त्यामुळे शिंगल्स होऊ शकतो.
म्हणूनच, वृद्ध लोकांना शिंगल्स होण्याची शक्यता वाढते. हा साधारणपणे पीडादायी, फोडासारखी पुरळ तयार करतो जी शरीराच्या किंवा चेहऱ्याच्या एका बाजूला दिसून येते.
व्हॅरिसेला झोस्टर विषाणू कांजण्यासाठी (चिकनपॉक्ससाठी) (ज्याला हर्पिस झोस्टर सुद्धा म्हणतात) जबाबदार असतो. एखाद्या व्यक्तीला कांजण्या (चिकनपॉक्स) झाल्यानंतर, विषाणू त्यांच्या शरीरात राहतो आणि निष्क्रिय होतो. हा विषाणू बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा सक्रिय होऊ शकतो आणि त्यामुळे शिंगल्स होऊ शकतो. हा विषाणू पुन्हा कशामुळे सक्रिय होतो याबाबतीत शास्त्रज्ञांना नेमके ठाऊक नाही. तथापि, त्याकरिता अनेक घटक कारणीभूत असू शकतात. वयानुसार एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. रोगप्रतिकारक शक्ती जितकी कमकुवत होते, तितकेच विषाणूला पुन्हा सक्रिय होण्यापासून रोखण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच, वृद्ध लोकांना शिंगल्सचा धोका वाढतो.
प्रथम, ज्याला कांजण्या झाल्या आहेत (चिकनपॉक्स झाला आहे) त्याच्यात आधीच शिंगल्सला कारणीभूत विषाणू असतो. काही लोकांना कांजण्या झालेल्या असतात (चिकनपॉक्स झालेला असतो) आणि त्यांना ते आठवत नाही किंवा कदाचित ते समजत नाही. कुठल्याही प्रकारे, त्यांना किती निरोगी वाटत असले तरी सुद्धा विषाणू पुन्हा सक्रिय झाल्यास त्यांना शिंगल्स होऊ शकतो.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांना शिंगल्स होण्याचा धोका वाढतो. आणि वयानुसार रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरित्या कालांतराने कमकुवत होत असल्याने, वयाच्या 50 व्या वर्षानंतर लोकांना त्याचा धोका वाढतो.
वृद्ध व्यक्तींना पोस्ट-हर्पेटिक न्यूराल्जिया (पी.एच.एन) सारख्या जटिलता भोगाव्या लागण्याची शक्यता वाढू शकते.
जेव्हा आपल्याला कांजण्याचा (चिकनपॉक्सचा) संसर्ग होतो तेव्हापासून शिंगल्सला कारणीभूत ठरणारा विषाणू शरीरात राहतो. पुन्हा सक्रिय होईपर्यंत तो सुप्तावस्थेत जातो.म्हणून दुसरी व्यक्ती संक्रमित होत नाही
तथापि, जर त्यांना कांजण्या झाल्या नसतील (चिकनपॉक्स झाला नसेल) किंवा त्यापासून संरक्षण दिले गेले नसेल तर तो दुसऱ्यास संक्रमित करू शकतो. जर ती व्यक्ती शिंगल्सने पीडित एखाद्या व्यक्तीच्या फोडांच्या थेट संपर्कात आली तर विषाणूचा संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे कांजण्या होऊ शकतात (चिकनपॉक्स होऊ शकतो).
सामान्यत: शिंगल्समुळे एक पीडादायी पुरळ तयार होते ज्यामुळे फोड येतात आणि 10 ते 15 दिवसात खपली तयार होऊन 2 ते 4 आठवड्यांत ती साफ होते. हे साधारणतः शरीराच्या किंवा चेहऱ्याच्या एका बाजूला दिसून येते. पुरळाने प्रभावित झालेल्या भागात लोकांना पुरळ दिसण्याच्या 48-72 तास आधीच वेदना, खाज सुटणे, मुंग्या येणे किंवा सुन्नपणा असे जाणवू शकते.
तणावामुळे आपल्याला शिंगल्सचा धोका वाढण्याची शक्यता आहे. असे म्हटले तरी सुद्धा, शिंगल्स होण्यासाठी वय हा सर्वात महत्वाचा घटक आहे. बहुतेक शिंगल्सची प्रकरणे 50 वर्ष किंवा त्याहून मोठ्या व्यक्तींमध्ये पाहायला मिळतात.
कांजण्या (चिकनपॉक्स) एक अतिशय सांसर्गिक आजार आहे ज्यामुळे सामान्यत: संपूर्ण शरीरावर फोडासारखे पुरळ येते, खाज सुटते आणि ताप येतो. चिकनपॉक्स विषाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतो आणि यामुळे शिंगल्स होऊ शकतो. शिंगल्सने त्रस्त लोकांना शरीराच्या एका भागात वेदना जाणवतात, खाज सुटते, मुंग्या येतात आणि फोड येऊ शकतात जे काही आठवडे राहू शकतात.
जर त्यांना कधीच कांजण्या झाल्या नसतील (चिकनपॉक्स झाला नसेल) तर त्यांना शिंगल्स होणार नाही. अशी शक्यता आहे की कदाचित ते नकळत विषणूच्या संपर्कात आले असतील किंवा कदाचित त्यांना ते आठवत नसेल. अशा परिस्थितीत, वृद्ध लोकांना शिंगल्स होण्याचा धोका असू शकतो.
हर्पिस झोस्टर ऑप्थॅलमिकस हा एक शिंगल्सचा संसर्ग आहे जो डोळा आणि डोळ्याच्या भागावर परिणाम करतो. कपाळावर पुरळ आणि सर्व ऊतींची पीडादायी दाह त्याच्या लक्षणांमध्ये मोडतात.
बहुतेक लोक शिंगल्सच्या संसर्गातून पूर्णपणे बरे होत असताना, काहींना आरोग्याच्या जटिलता भोगाव्या लागू शकतात.
पी.एच.एन ही एक आरोग्याची जटिलता आहे जी शिंगल्स असलेल्या 25% पर्यंत लोकांना प्रभावित करते. शिंगल्सचे पुरळ बरे झाल्यानंतर काही महिने किंवा वर्षे चालू राहणारे मज्जातंतूचे दुखणे हे पी.एच.एन च्या मुख्य लक्षणांपैकी एक आहे. सामान्यत: संक्रमित भागात दुखणे जाणवू शकते.
डोळ्याला किंवा नाकाला होणारी एक शिंगल्स पुरळ म्हणजे हर्पिस झोस्टर ऑप्थॅल्मिकस (एच.झेड.ओ) असलेल्या 50% लोकांना नेत्रसंबंधी जटिलता होतात. एच.झेड.ओ असलेल्या 30% लोकांमध्ये दुहेरी दृष्टी तयार होऊ शकते. डोळ्याच्या नेत्र (ऑप्टिक) मज्जातंतूला क्वचित नुकसान होते आणि एच.झेड.ओ असलेल्या 0.5% पेक्षा कमी लोकांमध्ये आढळते.
एन्सेफलायटीस (मेंदूची सूज) सारख्या न्यूरोलॉजिकल जटिलता क्वचित पाहायला मिळतात आणि शिंगल्सने त्रस्त 1% लोकांमध्ये त्या होण्याचा अंदाज वर्तविला जातो.
क्वचित प्रकरणांमध्ये, शिंगल्स व्हायरस श्रवण यंत्रणेत पुन्हा सक्रिय होऊ शकतो, ज्यामुळे हर्पिस झोस्टर ऑटिकस होऊ शकतो. लक्षणांमध्ये श्रवणदोष, चक्कर येणे (व्हर्टीगो), टिनिटस, चेहऱ्यावर तीव्र वेदना, चेहऱ्याचा अर्धांगवायू (रामसे हंट सिंड्रोम) सामील आहेत. संतुलनाशी संबंधित समस्या शिंगल्स असलेल्या 1% लोकांमध्ये तयार होऊ शकतात.
शिंगल्स झाल्यावर उद्भवणाऱ्या आरोग्याच्या जटिलतेची ही संपूर्ण यादी नाही. अधिक माहितीसाठी कृपया डॉक्टरांशी बोल.
शिंगल्समुळे सामान्यत: वेदनादायी आणि फोडासारखी पुरळ तयार होते, ज्यामुळे फोडांचा एक पट्टा उफाळून येतो जो एका मज्जातंतूंच्या मार्गावर धडाच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला गोल फिरलेला असतो. हे धड, हात, मांडी किंवा डोक्यावर (डोळे किंवा कानांसह) तयार होऊ शकते. वेदना#, जळजळ#, खुपसणे# किंवा शॉक-सारखे# असे लोकं बऱ्याचदा त्रासाचे वर्णन करून सांगतात. हे कपडे घालणे, चालणे आणि झोपणे यासारख्या रोजच्या हालचालींमध्ये बाधा निर्माण करू शकते.
शिंगल्सचा संसर्ग सामान्यत: त्वचेच्या पुरळापासून सुरू होतो जो शरीराच्या एका लहान भागाला प्रभावित करतो. प्रभावित व्यक्तीस पुरळ दिसण्याच्या 48-72 तास आधी प्रभावित भागातच विजेचे धक्के# किंवा नखे टोचणे# किंवा उकळत्या पाण्यामुळे होणारी जळजळ#, खाज सुटणे, मुंग्या येणे आणि सुन्नपणा यासारख्या वेदना सुद्धा जाणवू शकतात.
लोकांना ताप, डोकेदुखी, थंडी वाजणे किंवा पोट खराब होणे सुद्धा जाणवू शकते.
म्हणून, आपण यापैकी कोणतीही लक्षणे अनुभवत असल्यास, कृपया त्वरित डॉक्टरांशी बोला.
आपल्याला शिंगल्स झाल्यास, शिंगल्स आणि त्याच्या प्रतिबंधाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी बोला.
शिंगल्स प्रतिबंधाचे पर्याय
शिंगल्स हे कांजण्या (चिकनपॉक्स) झाल्यावर शरीरात राहणारा विषाणू पुन्हा सक्रिय झाल्याने होतो. म्हणून, जर एखाद्या व्यक्तीस कांजण्या झाल्या नसतील (चिकनपॉक्स झाला नसेल) तर त्यांना कांजण्या (चिकनपॉक्स) किंवा शिंगल्स झालेल्या लोकांशी संपर्क टाळण्यास सांगा. तसेच, कांजण्या (चिकनपॉक्स) होण्याचा धोका कमी करण्यासाठी ते सर्व हाताच्या आणि खोकल्याच्या स्वच्छता पाळत आहेत हे सुनिश्चित करा
लसीकरणामुळे शिंगल्स रोखण्यास मदत होऊ शकते. शिंगल्स आणि त्याच्या प्रतिबंधाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांशी बोला.
लसीकरण आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीस उत्तेजना देते जेणेकरून ते शिंगल्स विषाणूशी लढा देऊ शकेल आणि त्यास पुन्हा सक्रिय होण्यापासून रोखू शकेल.
उपचार केल्याने आजाराची तीव्रता आणि कालावधी कमी होऊ शकतो आणि आपल्या लक्षणांवर आधारित, उपचारांच्या प्रभावांमध्ये विषाणूला कमकुवत करणे आणि/किंवा पीडा कमी करणे सामील असू शकते.
आपल्याला जर वाटत असेल की आपल्याला शिंगल्स झालेला आहे, तर कृपया लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांशी बोला. त्यांना योग्य ती औषधे लिहून देता येतील जेणेकरून आपल्या लक्षणांची तीव्रता आणि कालावधी कमी करण्यात मदत होऊ शकेल.
लक्षणांचा प्रबंध करण्यासाठी सामान्य सल्ला:
शिंगल्स आणि त्याच्या प्रतिबंधाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी डॉक्टरांशी बोला.
संदर्भ